शनिवार, १३ मे, २०२३

गुलाबी मतदान केंद्र (पिंक बूथ)

कोपरगांव तालुक्यातील ‘गुलाबी मतदान केंद्रां’ची राज्य निवडणूक आयोगाकडून दखल !

‘निवडणूक वार्ता ’ गृहपत्रिकेत उपक्रमाविषयी माहिती



शिर्डी, दि.१२ मे (उमाका वृत्तसेवा) – कोपरगावं तालुक्यात डिसेंबर २०२२ मध्ये ग्रामपंचायत निवडणूका पार पडल्या. या निवडणूकीत तालुका प्रशासनाच्या वतीने नऊ ठिकाणी ‘गुलाबी मतदान केंद्र’ उभारण्यात आले होते. या उल्लेखनीय उपक्रमांची राज्य निवडणूक आयोगाच्या ‘निवडणूक वार्ता’ गृहपत्रिकेत दखल घेण्यात आली आहे.



महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने दर सहा महिन्यांनी ‘निवडणूक वार्ता’ ही गृहपत्रिका (न्यूज लेटर) प्रकाशित करण्यात येते. नुकत्याच प्रसिध्द झालेल्या निवडणूक वार्ताच्या सहामाही अंकात पृष्ठ क्रमांक ९ वर कोपरगांव तालुका प्रशासनाने राबविलेल्या ‘गुलाबी मतदान केंद्र (पिंक बूथ)’ या उल्लेखनीय उपक्रमाविषयी माहिती देण्यात आली आहे.



कोपरगांव तहसीलदार विजय बोरूडे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. डिसेंबर २०२२ मध्ये तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींसाठी निवडणूका पार पडलेल्या. यात शिंगणापूर येथे चार व माहेगाव देशमुख येथे पाच गुलाबी मतदार केंद्र उभारण्यात आले होते. मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, व मतदान सहाय्यक म्हणून महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. विशेष म्हणजे मतदान केंद्राची सुरक्षादेखील महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली होती. प्रथम महिला केंद्राध्यक्षा म्हणून विद्युल्लता आढाव यांनी कामकाज पाहिले.



 मतदारांच्या स्वागतासाठी असलेले रेड कार्पेट लक्ष वेधून घेत होते. गुलाबी फुगे, गुलाबी रंगाचे पडदे, सर्व मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गुलाबी रंगाचा पेहराव होता. त्यामुळे संपूर्ण वातावरण गुलाबी झाले होते. या सर्व मतदान केंद्रांवर उत्साही वातावरणात सुरळीतपणे मतदान पार पडले होते.

000000 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

एक हजार गावांना स्वच्छतेचा मंत्र देणारा अवलिया !

एक हजार गावांना स्वच्छतेचा मंत्र देणारा अवलिया ! संत गाडगेबाबांच्या शिकवणीचा अंगीकार हातात खराटे, फावडी, घमेली घेत एक अवलिया गावांमध्ये अवतर...