‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमास 13 मे २०२३ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सातारा
येथून सुरूवात झाली. यानिमित्ताने शिर्डी उप माहिती कार्यालयाने संकलित केलेल्या
विविध शासकीय योजनांची माहिती देत आहोत.
‘शासन आपल्या दारी’
-------------------------------------------------------------------
बळीराजाच्या उन्नतीसाठी योजना
महाडिबीटी कृषी यांत्रिकीकरण योजना – या योजनेत ट्रॅक्टर साठी 1.25 लाख किंवा १ लाख रुपये, इतर औजारासाठी 50% किंवा 40% आणि ठिबक, तुषारसाठी 80% किंवा 75% अनुदान
योजनेनुसार दिले जाते. ट्रॅक्टर,
पॉवरटिलर, नागर,
रोटाव्हेटर, औजार बँक, कडबाकुट्टी मशिन,
रिजर, ऊस पाचट कुट्टी यंत्र, कल्टीव्हेटर, पेरणीयंत्र,
ट्रॅक्टर ट्रॉली, स्प्रेअर, मिनीराईस मिल,
दालमिल, पॉवरविडर, ग्रिनहाऊस,
शेडनेटहाऊस, पॅकहाऊस, नर्सरी, प्लॅस्टिक
मल्चिंग, इलेक्ट्रिक मोटर, PVC/HDPE
पाईप
ठिबक संच, तुषार संच, शेततळे इत्यादी औजारे दिली जातात.
योजनेच्या लाभासाठी 7/12
, 8अ उतारा, बँक पासबुक, आधारकार्ड, आधारलिंक असणारा मोबाईल, औंजाराचे दरपत्रक,
औजार टेस्ट रिपोर्ट आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.
योजनेच्या लाभासाठी तालुका कृषी अधिकारी,
कृषी
विभागाच्या वेबसाईटवर किंवा www.mahadbt.maharashtra.gov.in यांच्याकडे अर्ज
करता येईल.
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गंत फळबाग लागवड
योजना - या योजनेत ३ वर्षात विभागून शंभर
टक्के अनुदान दिले जाते. फळबाग लागवड (सलग
/ बांधावर / पडीक जमीनीवर) योजनेत समाविष्ट फळपीके/फुलपिके यामध्ये आंबा, काजू,
चिकू, पेरू,
डाळिंब, संत्रा,
मोसंबी, कागदी लिंबू, नारळ, बोर, सिताफळ,
आवळा, चिंच,
कवठ, जांभूळ,
कोकम, फणस,
अंजीर, सुपारी,
बांबू, साग,
केळी, शेवगा इत्यादी फळबागांचा समावेश होतो. फुलझाडांमध्ये गुलाब, मोगरा, निशिगंध, सोनचाफा यांचा समावेश
होतो. या योजनेत गांडुळ खत युनिट, नाडेप कंपोस्ट युनिट व शेततळ्यासाठी ही अनुदान देण्यात येते.
योजनेच्या लाभासाठी 7/12 , 8अ उतारा, बँक पासबुक,
आधारकार्ड, जॉबकार्ड, लेबर बजेट प्रमाणपत्र, अंदाजपत्रक व ग्रामसभा ठराव आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.
योजनेच्या लाभासाठी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे ऑफलाईन अर्ज करता येईल.
सिमांत शेतकरी गट बांधणी करणे - महाराष्ट्र
शासनाच्या विविध योजनांचे प्राधान्य हे प्रथम शेतकरी गटाला दिले जाते. यामध्ये
विविध शेतकरी हे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व
मत्स्यव्यवसाय व रेशीम उद्योग करणारे शेतकरी गट आहेत. या गटांना प्रशिक्षण देणे, त्यांच्या स्पर्धा भरवणे, अनुदान देणे इत्यादी, बाबींचा लाभ दिला
जातो.
शेतकरी गटाला औजारांसाठी बॅक कर्जावर ४० टक्के अनुदान दिले जाते. गोडावून बांधकाम,
निविष्ठांची एकत्रित खरेदी (बियाणे, खते, किटकनाशके, तणनाशके), नवीन तंत्रज्ञान,
प्रशिक्षण, निविष्ठा, अभ्यासदौरे यासाठी अनुदान दिले जाते. शेतकरी उत्पादक कंपनी
स्थापन करण्यास उत्तेजन देण्यात येते. प्रक्रिया उद्योगासाठी सहाय्य केले जाते.
योजनेच्या
लाभासाठी किमान 11 शेतकऱ्यांचा गट आवश्यक आहे. सर्वांचे 7/12 , 8अ उतारे किंवा
शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र, आधारकार्ड, प्रथम बैठकीचे इतिवृत्त व फोटो, गटाच्या
नावाचा शिक्का तसेच १२५० रूपये फी(नोंदणी फी, स्टॅम्पपेपर, पुस्तकाची फी) आवश्यक
आहे.
योजनेच्या लाभासाठी कृषी सहाय्यक किंवा तालुका कृषी विभाग किंवा तालुका आत्मा
यंत्रणेकडे अर्ज करता येईल.
केंद्र पुरस्कृत - प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया
योजना – या योजनेत वैयक्तिक लाभार्थीला भांडवली गुंतवणूकीकरिता ३५% किंवा कमाल रु.१०
लाखापर्यंत अनुदान दिले जाते. भांडवली गुंतवणुक व सामाईक पायाभुत सुविधा, गट
लाभार्थी ३५% अनुदान कमाल केंद्र शासनाच्या विहित मर्यादेत दिले जाते. मार्केटिंग
व ब्रॅन्डींग ५०% अनुदान कमाल केंद्र शासनाच्या विहीत मर्यादेत दिले जाते. इन्क्युबेशन
सेंटर अनुदान शासकीय संस्था - १००% ; खाजगी संस्था - ५०% ;
अनुसुचित जाती व जमाती - ६०% दिले जाते. तसेच स्वयंसहाय्यता गटांतील
सदस्यांना बीज भांडवल रु.४०,०००/- प्रति सदस्य
प्रशिक्षणासाठी लाभार्थ्यांना १००% अनुदान दिले जाते.
योजनेच्या लाभासाठी किमान उद्योग नोंदणी प्रमाणपत्र,
पॅनकार्ड, आधारकार्ड, प्रकल्प अहवाल, साहित्य दर पत्रक, उद्योगाचे मागील तीन
वर्षाचे ऑडीट व कर्ज प्रक्रियेकरिताचे कागदपत्र आवश्यक आहेत.
या योजनेच्या अधिक माहितीसाठी तालुका कृषी विभाग, आत्मा यंत्रणा किंवा www.pmfme.mofpi.gov.in संकेतस्थळावर
संपर्क साधावा.
संकलन – उप
माहिती कार्यालय, शिर्डी.
******
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा