शासन निर्णय क्र : शासन निर्णय बीसीएच-2016/प्र.क्र.293/शिक्षण-2, दिनांक 13 जून, 2018
- योजनेचा उद्देश :-
अनु. जातीचे व नवबौध्द
विद्यार्थ्यांना शासकीय वसतीगृहांत मर्यादीत जागा असल्याने काही विद्यार्थ्यांना
शासकीय वसतीगृहात प्रवेश मिळत नाही. त्यामुळे पुढील शैक्षणिक प्रवेशास मर्यादा येत
आहेत. अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे
म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा या विद्यार्थ्यांना स्वत:
उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्याच्या आधार संलग्न बँक
खात्यामध्ये थेट जमा करण्याकरिता शासनाने सन 2016-17 पासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब
आंबेडकर स्वाधार योजना सुरु केलेली आहे.
- योजनेचा लाभ घेण्यासाठी निकष :-
1) विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असावा.
2) विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
3) शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमास
विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला असावा.
4) विद्यार्थी हा अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील असावा
5) विद्यार्थ्यांना 10 वी/ 11 वी /11वी / पदवी / पदविका
परिक्षेमध्ये 50% पेक्षा जास्त गुण असणे अनिवार्य आहे.
6) अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा 40% असेल.
7) विद्यार्थी अहमदनगर महानगरपालीका हृदद व हददी पासून 5 कि.मी.
अंतरापर्यंत शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेशित
असावा.
8) विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त
नसावे.
9) भारत सरकार शिष्यवृत्ती अंतर्गत प्राप्त होत असलेल्या निर्वाह
भत्याची रक्कम वजावट करून उर्वरित निर्वाह भत्ता,
भोजन भत्ता, निवास
भत्ता, याची रक्कम अदा करण्यात येईल.
10) विद्यार्थ्यांची महाविद्यालय उपस्थिती किमान 75 टक्के आवश्यक राहील.
- लाभाचे स्वरूप:
१) भोजन भत्ता: 25000/-
२) निवास भत्ता : 12000/-
३) निर्वाह भत्ता : 6000/-
प्रती विद्यार्थी एकूण देय रक्कम : 43000/-
टीप : उपरोक्त रक्कमेव्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील
विद्यार्थ्यासाठी प्रतीवर्ष रु.5000/ व अन्य शाखेतील विद्यार्थ्यासाठी रु 2000/-
इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरुपात देण्यात येईल.
- संपर्क : -
1) सहायक आयुक्त, समाज कल्याण,
अहमदनगर.
2) गृहपाल, मुलांचे शासकीय वसतिगृह, लेंडकर मळा, बालिकाश्रम
रोड, अ.नगर
३) गृहपाल संत सखुबाई मुर्लीचे शासकीय वसतिगृह, स्वस्तिक
चौक, अ.नगर.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा